Tuesday, November 12, 2024

Men in love

Men in Love" ही संकल्पना ती नाही जी आपण सोशल मिडीयावर, चित्रपटात, मालिकांमधे पाहतो, तर प्रेमात पडलेला पुरुष त्याहीपेक्षा खूप वेगळा अन खास असतो.

आपल्या आवडत्या स्त्रीसाठी दुनियेशी लढणारा तर जुन्या काळात अगदी लढाईत असतानादेखिल पत्र पाठवणारा पुरुष, तिच्या खांदयावर डोकं टेकवून स्वतःचा निवारा शोधूणारा तर कधी मनातल दुःख मांडून तिच्या कुशीत अगदी मोक‌ळेपणाने रडणारा पुरुष, 

तिच्या मनातलं ओळखता येत नसूनही सारखं सारखं विचारणारा तर तिच्यासोबत भविष्याची स्वप्ने पाह‌णारा पुरुष, तिच्यासोबत कुठलाच पुरुषी अहंकार न दाखवणारा तर एकत्र रहायचं आहे म्हणून अतोनात कष्ट करणारा पुरुष, 

तिची मासिक पाळीत काळजी घेण्यापासून ते तिच्या गरोदरपणात तिचं सगळं काही नीट करणारा पुरुष, तिच्यासाठी स्वतःची काळजी घेणारा तर तिचीही काळजी घेणारा पुरुष,

तिच्या वाईट काळात तिच्या सोबत खंबीरपणे उभा राहणारा तर, स्वतः संकटात असतान तिने दिलेल्या आधाराची जाण ठेवणारा पुरुष, 

तिच्यासोबत लग्न करून आयुष्यभर सोबत संसार फुलवणारा पुरुष तर सोबत तुटलीच तर सगळं स्विकारून तिच चांगलं व्हावं म्हणून सकारात्मक विचार करणारा पुरुष याला म्हणतात "Men in Love"... 

✍️वसुधा इंगळे.

Friday, November 8, 2024

थोड मनातलं







समोरच्या माणसाला आपण वैयक्तिकरित्या ओळखत नसतानाही किती लवकर जज करत असतो.ही अशीच आहे तशीच दिसते, तो असाच असणार, ही अशीच वागते वगैरे वगैरे. सोशल मिडियाने जजमेंट पास करणारा मेढरांचा एक कळप तयार केलेला आहे. जिथं गोष्टींचं आकलन नकरता प्रत्येकच जण गोष्टीबद्दल मत बनवू लागला आहे किंवा अगदीच मत मांडू लागला आहे..

आपल्या शाळेत आपण वेगळे असतो, मग कॉलेजात अजून बदलतो, तसेच आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर माणूस बदलत राहतो. पण त्या त्या टप्प्यावर भेटलेल्या माणसांच्या मनात आपली प्रतिमा तिच राहते. वेळेनुसार माणूस बदलत असतो. हे कुणाला तितकंसं पचनी पडणारं नसतं किंवा तेवढा विचार करण्याइतपत पाहिजे असणारा समजूतदारपणा कदाचित अस्तित्वातच नसवा. 

आता हे कधी बदलेल का ? तर हे कधी बदलेल की नाही माहीत नाही. पण आपण या लोकांच्या जजमेंट्सना नक्कीच दुर्लक्षित करू शकतो.
✍️वसुधा इंगळे.

Monday, November 4, 2024

दिवाळी


 दिवाळी आली... घराची सजावट करून झाली, फराळ तयार झाला, नवीन कपडे घेऊन झाले अन् सुट्ट्याही मिळाल्या. पण आता लहानपणीइतकी एक्साइटमेंट काही राहीली नाही दिवाळीची..लहानपणीची दिवाळी वर्षभर वाट पाहिल्यावर यायची. वडिलांकडे केलेले नवीन कपड्यासाठीचे अन फटाक्यांचे हट्ट, आईला फराळात केलेली मदत, मोती साबन, उटणं, घरभर अन अंगणात केलेली पणत्यांची आरास, शाळेतून दिलेला दिवाळीचा अभ्यास, भाऊबीजेला लहान किंवा मोठ्या भावाकडून ओवाळणी म्हणून घेतलेले दहा रुपये, अंगणात आईने काढलेली रांगोळी, फराळासाठी घरी आलेले पाहूणे आणि भाऊबीजेला आईसोबत अनुभवलेल मामाच गाव....

सगळं आता मोठं झाल्यावर हरवून गेल्यासारख झालं आहे. जबाबदाऱ्या अंगावर पडल्या अन् विसरून गेलो दिवाळी जगायची कशी असते. खिशात भरमसाठ पैसा आहे. पन ती लहानपणीची दिवाळी होती, तशी आता वाटत नाही. बाकी काय तर जोपर्यंत लहान आहोत आणि आईवडील आहेत तोपर्यंत खरी दिवाळी अन त्यानंतरच्या फक्त जबाबदाऱ्या!

✍️वसुधा इंगळे.

Thursday, March 7, 2024

Clarity


 Hiii, सगळे मस्त ना..! आजचा दिवस सुद्धा खूप मस्त होता. तुमच्या सगळ्यांना पण मस्तच गेला असेल अशी आशा करते. जेव्हा आपण स्वतःला आरशात बघायला जातो आणि तेव्हा जर तो आरसा स्वच्छ नसेल तर आपण त्यामध्ये स्वतःला नीट नाही बघू शकत.आपल्याला जर स्वतःचे रूप आरशामध्ये clear बघायचे असेल तर आरसा पुसावा लागेल. हे तर झाल आरशाचे पण आपल्या सगळ्यांमध्ये खूप सारे गुण असतात. प्रत्येक जण हुशार असते, प्रत्येक जण जिद्दी असते, प्रत्येक जण सहनशील, धाडशी, कर्तृत्ववान असते.मात्र हे सगळे गुण कुठेतरी धूळ खात आपल्या सगळ्याच्या आतमध्ये दडलेले असतात. जसे आसरा पुसला की आपण clear दिसायला लागतो. तसेच आपल्यामध्ये दडलेले गुण बाहेर काढले, त्यावर बसलेली धूळ बाहेर काढली की आपल्याला आयुष्याची clarity येते आणि त्यामुळे आपण जे ठरवले आहे ते नक्कीच पूर्ण करू शकतो. चला उद्या परत भेटू. हसत रहा आणि खुश रहा.bye

✍️वसुधा इंगळे.

Friday, March 1, 2024

विचार

 Hii, सगळे मस्त ना..! आजचा दिवस सुद्धा खूप मस्त होता. तुमच्या सगळ्यांना सुद्धा मस्तच गेला असेल अशी आशा करते. इंस्टाग्राम वरती आपण जे जास्त बघत असतो त्याच्याच संबंधित पोस्ट आपल्याला सारख्या सारख्या दिसतात. म्हणजे आपल्या मनात जे चालते जे आपल्याला बघावे वाटते ते आपल्याला लगेंच समोर दिसते. हे तर इन्स्टाचे झाले. आपल्या खऱ्या आयुष्यात सुद्धा आपण जसा विचार करू तसे आपले आयुष्य बनत जाते आपण नेहमी छान छान हसत असू नेहमी सकारात्मक असू तर आपले आयुष्य सुद्धा तसेंच छान छान बनते.इन्स्टा आपल्या आवडीनुसार पोस्ट दाखवते मग आयुष्य का नाही बनणार आपल्या मनात जसे असेल तसे..? बनते हो. मी सांगते ना.त्यामुळे नेहमी छान छान हसत रहा आणि खुश रहा.bye


✍️वसुधा इंगळे.

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...