Monday, March 20, 2023

गये तो गम नहीं अपने पास कम नहीं!!!

  'गये तो गम नहीं अपने पास कम नहीं!!!

मला माहिती नाही. कोण आपल्याबद्दल काय आणि कसा विचार करतात? वाईट अथवा चांगला, मुळात याने आपल्याला काही फरक पडत नाही , आणि पडायला सुद्धा नको.

 मत बनवणारी माणसं असंख्य असतात. ती तुम्हाला भेटल्याशिवाय सुद्धा तुमच्याबद्दल एक विशेष मत बनवून मोकळी होतात. एखाद्याला तुम्हाला वाईटच समजायचंच असेल तर तुम्ही कितीही प्रयत्न केले तरीही तो तुमचा द्वेषच करणार, तुम्हाला वाईटच समजणार. 

कारण दृष्टीचा इलाज आहे दृष्टीकोनाचा नाही. त्यामुळे तुम्हाला जी माणसं ओळखतात, मानतात त्यांना जास्त महत्व द्या.

 गर्दीच्या मागे लागू नका. वेळेनुसार येणारे येतील आणि जातील. पण जे तुम्हाला समजून घेतात ती कायम तुमच्यासोबत राहतील..यामुळे 'गये तो गम नहीं अपने पास कम नहीं!!!


✍️वसुधा इंगळे


No comments:

Post a Comment

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...