Thursday, November 30, 2023

अपेक्षा

 Hii, सगळे मस्त ना..! आजचा दिवस सुद्धा खूप छान होता. तुम्ही बोलत असाल. अरे देवा काय मुलगी आहे हिचे सगळेच दिवस छान जातात. देव हिचा जवळचा मित्र आहे की काय..? पण असे काही नाही आहे.


आयुष्य सगळ्यांचे वेगवेगळे असले, तरी सुद्धा सुख आणि दुःख ह्या दोन्ही गोष्टी सगळ्यांच्या वाटेला येत असतात. पण मग तुम्ही बोलाल मग ही रोज खुश कशी असते. तर ह्याच एकच कारण आहे. कोणासाठी काही केले तर ते परत return येईल ह्याचा विचार अजिबात करायचा नाही. लोकांकडून अपेक्षा ठेवायच्या नाहीत. स्वतःला खुश करण्यासाठी आपण स्वतः समर्थ आहोत हा विचार मनाशी पक्का करायचा आणि हसत हसत रोजचा दिवस छान घालवायचा. okay तुम्ही पण असंच करा, आणि हसत आणि खुश रहा..bye


✍️वसुधा इंगळे

No comments:

Post a Comment

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...